बांबवडे इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या आठवणीसाठी मुकयात्रा
बांबवडे : १७ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचे देहावसान झाले. संभाजी महाराजांच्या बलिदानाचा हा दिवस बांबवडे येथे बलिदान मासाची सांगता करून,करण्यात आला. सकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या आठवणी प्रती मुकयात्रा काढण्यात आली.
आपल्या राजाला अनेक यातना सहन करत ,बलिदान द्यावे लागले. आपला धर्म ,आपले स्वराज्य टिकून राहावे, यासाठी आपल्या राजाने खूप सहन केले. त्यांचा मृत्यू १७ मार्च १६८९ रोजी झाला. त्यांच्या यातनांची ,त्यांच्या बलिदानाची आपल्याला आठवण रहावी,यासाठी प्रत्येकाने हा बलिदान मास पाळला पाहिजे.
बांबवडे इथं बांबवडे स्थानकापासून मारुती मंदिरापर्यंत हि मुकयात्रा काढून तरुण,आणि ग्रामस्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी सुरेश म्हाऊटकर ,शाहीर अनिल तळाप,यांनी मनोगते केली.तर आभार रणजीत यादव यांनी मानले. यावेळी सचिन मूड शिंगकर, राजू बुवा, तुषार पाटील, ओंकार पवार, रोहन निकम, विकास पाटील, संदीप पाटील, दिग्विजय पाटील, शरद सुतार, तुषार वाणी, राकेश कुंभार, नितीन सुतार, यांसह शंभूराजे प्रेमी, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.