ट्रक ला मोटारसायकलची धडक : एक ठार : माणुसकीची अनास्था

बांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी येथील पिशवी रस्त्यावर  मानसिंग दादा मळ्याच्या फाट्या समोर  ट्रकला एका दुचाकीस्वराची  धडक होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.

घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार , सोनवडे ता.शाहुवाडी येथील अर्जुन शंकर पाटील (वय ४४ वर्षे) हे बांबवडे येथून सोनवडे कडे आपल्या घराकडे निघाले होते.तेव्हा मानसिंग दादा मळा फाट्याजवळ ट्रक ( क्र.MH09 CU 6660) ला अर्जुन पाटील यांची दुचाकी (क्र.MH09 CD ५९२७) ची  मागून धडक झाली. या अपघातात अर्जुन पाटील गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र बांबवडे येथे त्यांना नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी आर.ए.निकम यांनी मृत झाल्याचे घोषित केले. दरम्यान ज्यावेळी अपघात झाला होता,त्यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती परंतु त्यापैकी तत्काळ कुणी उपचारासाठी नेले नाही. त्यामुळे अधिक रक्तस्त्राव झाला.

दरम्यान जि.प.सदस्य पै.विजय बोरगे, विक्रम पाटील आंबर्डेकर , बांबवडे चे माजी सरपंच विष्णू यादव , डे.सरपंच सयाजी निकम,अर्जुन निकम  यांनी त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बांबवडे येथे दाखल केले. हेच जर उपचार वेळेत मिळाले असते तर कदाचित  त्यांचे प्राण सुद्धा वाचले असते. माणसातील माणुसकी संपत चालली आहे का? असाच प्रश्न या एकंदरीत घटनेवरून चर्चेला येत आहे. दरम्यान अर्जुन पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

7+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!