भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक दीपस्तंभ

बांबवडे : ज्या महामानवाने अखंड भारत देशाला संघर्ष करून, शिक्षण घेण्याचा संदेश दिला, ज्या माध्यमातून आपण आर्थिक व सामाजिक दृष्ट्या संपन्न होवू. अशा महामानवाची म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२७ वी जयंती संपन्न होत आहे. अशा महामानवाला साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने विनम्र अभिवादन.
ज्या व्यक्तिमत्वाने समाजातील विषमतेला तिलांजली देण्यासाठी शिक्षण घेण्याचा महत्वपूर्ण संदेश दिला. केवळ संदेश दिला नाही, तर आपल्या कृतीतून संपूर्ण जगाला दाखवून दिले कि, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ज्या सामाजिक विषमतेमध्ये अवघा समाज भरडला जातोय, ती विषमता दूर करण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही. असे अनेक विचार त्यांनी स्वकर्तुत्वातून जगासमोर मांडले. स्वतः उच्च शिक्षित होवून समाजाला एक नवी वाट दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला.
केवळ दलित समाजच नव्हे, तर प्रत्येक समाज जो दारिद्र्यात पिचत पडला आहे. सावकारांच्या आणि समाजातील स्वतःला उच्चभ्रू समजून घेणाऱ्या व पिचलेल्या जनतेवर अन्याय करणाऱ्या, अशा प्रत्येक समाजाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. अनिष्ठ रूढी परंपरांना फाटा देवून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतः ला घडवण्याचा संदेश, दारिद्र्यात पिचत पडलेल्या समाजाला दिला. यामुळे समजत नवी क्रांती घडली,ज्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास समजलेल्या समाजाला एक नवी दिशा मिळाली. विचारांच्या या वादळामुळे दलित समाज आपली कात टाकत आहे. आणि नवी पिढी जी सुशिक्षित असेल, अन्याय सहन करणारी नसेल, अशी पिढी घडवण्याचं मोलाचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं.
एकेकाळी फाटक्या तुटक्या कपड्यात वावरणाऱ्या समाजाला, सुटाबुटात आणणाऱ्या या महामानवाला त्यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त पुनश्च विनम्र अभिवादन.!!!!

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!