बांबवडे पोलीस वसाहत पोलीसांविनाच…

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील पोलीस वसाहत पोलीसांविनाच धूळ खात पडली असून, या जागेचा उपयोग रोड रोमियो मुलींना त्रास देण्यासाठीच करीत आहेत. याची दखल पोलीस खाते कधी घेणार, हा एक संतप्त प्रश्न नागरिकांतून विचारला जावू लागला आहे.
बांबवडे हि तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून ,सुरक्षेच्या दृष्टीने इथं दूरक्षेत्र पोलीस ठाणे असावे ,अशी मागणी नागरीकातून केली जात होती. त्यानुषंगाने ग्रामपंचायतीने ३५ गुंठे जागा पोलीस खात्यास देवू केली. या जागेत पोलिसांना रहाण्यासाठी वसाहत निर्माण केली गेली. सुरुवातीला पोलीस कर्मचारी रहात होते. परंतु सद्यस्थितीत इथे कुणीही पोलीस कर्मचारी रहात नाहीत. याच्याही पुढे जावून या वसाहतीचा वापर टवाळखोर मूलं,मुलींची छेड काढण्यासाठी बसायला मिळालेलं ठिकाण म्हणून या जागेचा वापर करतात, हे दुर्दैवाच आहे.
एकंदरीत एक उदात्त उद्देश ठेवून देवू केलेल्या जागेचा गैरवापर होत आहे. जर या ठिकाणी पोलीस रहाणारच नसतील तर पोलीस खात्याने हि जागा ग्रामपंचायतीला परत का देवू नये,असाही प्रश्न इथं उपस्थित होत आहे.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!