वळवाच्या पावसाने बांबवडे पंचक्रोशीत गारवा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी च्या पंचक्रोशीत वळवाच्या पावसाने काही अंशी का होईना , गारवा निर्माण केला.
आज दि.१२ मे ची पहाटच काळ्या आभाळाने झाली. पंचक्रोशीत भरलेल्या या काळ्या आभाळाचे रुपांतर काही वेळातच पावसात झाले, आणि सर्वत्र मातीचा गंध दरवळला. मातीच्या गंधाने आसमंत भरून गेला. काही काळ पडलेल्या या वळवाच्या पावसाने मात्र पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सुखद धक्का दिला. कारण सूर्याच्या उष्णतेने अवघी धरणी भाजून निघाली होती. कधी नव्हे ती, एवढी उष्णता निर्माण झाल्याने उष्माघात होतो कि काय, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. पण वळवाच्या या पावसाने दिलेला सुखद अनुभव निश्चितच हवा,हवासा वाटला.