शिंपे चे अभिजित पाटील सर ‘ सेट ‘ उत्तीर्ण
बांबवडे : शिंपे तालुका शाहुवाडी येथील श्री . अभिजित आबासाहेब पाटील हे समाजशास्त्र विषयातून ‘ सेट ‘ परीक्षा उत्तीर्ण झाले. सदर परीक्षा जानेवारी मध्ये झाली होती.
ते सध्या चिखली तालुका शिराळा येथील देशभक्त आनंदराव नाईक महाविद्यालयात कार्यरत असून त्यांना शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. जगन कराडे, डॉ.पी.एम.माने, प्राचार्य डॉ. एस.आर. पाटील, प्रा. एस.डी. सूर्यवंशी, तसेच सर्व स्टाफ आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्था अध्यक्ष अमरसिंह नाईक, माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर, आई-वडील आबासाहेब पाटील ( माजी संचालक कोडोली अर्बन बँक ),भाऊ अरविंद पाटील सर व पत्नी यांचे आशिर्वाद व सहकार्य लाभले.