शिराळ्यात ‘ कलाकार मेळावा ‘ संपन्न
शिराळा: कलाकार मेळावा व काव्यसंग्रह प्रकाशन समारंभात बोलताना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले सोबत वैजनाथ महाजन,अभिनेते राहुल कुमार,जयंत भालेकर,विशाल सावंत, सत्यजित देशमुख, बाबासाहेब परीट,सुनंदा सोनटक्के,के.डी.पाटील
शिराळा,ता.६: ग्रामीण भागातील मुलांच्या अंगी चांगले कलागुण आहेत. त्यांना चित्रपट क्षेत्रात संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करू. कलाकारांनी आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी असे प्रतिपादन, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केले.
शिराळा येथे शिराळा सांस्कृतिक कलामंच व अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि पंचायत समिती शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाकार मेळावा व वनिता जांगळे यांच्या काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
यावेळी राजेभोसले म्हणाले, ग्रामीण भागातील कलाकारांना योग्य दिशा मिळण्याची गरज आहे. ती दिशा मिळवून देण्याचे काम शिराळा सांस्कृतिक कला मंचाने हाती घेतले आहे. त्यांना या पुढील काळात योग्य ते सहकार्य करू. अशा प्रकारचा ग्रामीण भागातील हा पहिला मेळावा आहे, हि कौतुकाची बाब आहे.
स्वागत अनंत खोचरे तर प्रास्ताविक रंगराव घागरे यांनी केले.
यावेळी कवयत्री वनिता जांगळे यांच्या ‘ शब्द धारा ‘ या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी अभिनेते राहुल कुमार, अभिनेते जयवंत भालेकर, कलादिग्दर्शक विशाल सावंत, समीक्षक व साहित्यिक वैजनाथ महाजन, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट, जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख, के.डी.पाटील, नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, कवयत्री स्वाती पाटील, वनिता जांगळे, संभाजी जांगळे,विशाल सावंत उपस्थित होते. आभार शिवाजीराव चौगुले यांनी मानले.