मुंबईत पहिलाच पाऊस ‘ मुसळधार ‘
मुंबई : मुंबई सह उपनगरांमध्ये पावसाने आज सकाळपासून सुरुवात केल्याने मुंबईत पाणीच पाणी झाले आहे. परेल, भायखळा, अंधेरी, वांद्रे आदी उपनगरांसह सगळीकडे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
मुंबई आणि उपनगरात ८,९, १० रोजी मुसळधार पावसाच्या शक्यतेचा अंदाज हवामान खात्याने अगोदरच वर्तवला होता.
पावसाच्या पहिल्याच आगमनाने मुंबईत पाणी साचले असून, महापालिका यंत्रणा सजग झाली आहे.