अपंगत्वावर मात करत बाजीराव वारंग ‘ सेट ‘ उत्तीर्ण
शाहूवाडी : करुंगळे तालुका शाहुवाडी येथील बाजीराव राजाराम वारंग यांनी युजीसी अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या अधिव्याख्याता ( सेट ) परीक्षेत उत्तीर्ण होवून अर्ध्यावर प्रयत्न सोडणाऱ्या मंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. कारण वारंग हे अपंग असूनही त्यांनी स्वतःच्या जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवला.प्रखर इच्छाशक्ती, निश्चित ध्येय,आणि कठोर परिश्रमातून अपंगत्वावर मत करत हे यश मिळवले आहे. सध्या ते करंजोशी इथ राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.
अनंत अडचणींना सामोरे जावून, संघर्षमय परिस्थितीमध्ये मिळविलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे. यासाठी आईने केलेले काबाडकष्ट ,भाऊ सर्जेराव वारंग यांनी दिलेला आधार, पत्नी सौ.प्रतिभा वारंग यांनी दिलेली प्रेरणा व समर्थ साथ , या यशामुळे सार्थकी लागली.
त्यांच्या या यशासाठी कॉलेजचे संस्थापक पी. डी. पाटील, प्रा. मेस्त्री, प्रा.शिरसाठ, व इतर सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.