पाणी फौंडेशन ची प्रेरणा पैजारवाडी त दाखल : श्रमदानातून गावचा विकास

पैजारवाडी : पाणी फाऊंडेशन या कार्यक्रमातुन प्रेरणा घेऊन दुष्काळ प्रसंगी गावाची तहान भागवण्यासाठी “पाणी आडवा पाणी जिरवा “, जलयुक्त शिवार, जलसंधारण, अशा योजने अंतर्गत कित्येक गावांनी केलेले श्रमदान पाहता, आणि त्यापैकीच जवळच्या जाखले, मनपाडळे, येथे हजारो हात श्रमदानासाठी पुढे येत असल्याचे पाहून, पैजारवाडी (ता.पन्हाळा) येथील तरुण युवक प्रोत्साहित झाली आहेत. या तरुणांनी गावास वर्षानूवर्षे भेडसावत असणारी पाण्याच्या टंचाई वर मात करण्यासाठी सुरुवातीला गावाच्या दक्षिण बाजूस आसणाऱ्या पक्क्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. या मोहिमेसाठी श्रमदानास प्रारंभ केला. सुरुवातीला खूप कमी लोकं होती, पण गावासाठी श्रमदान सुरू आहे, हे पाहून माळावर क्रिकेट खेळणारी मूलं खेळ बंद करुन, श्रमदानस हजर राहू लागलीत. हळू-हळू गावातील लोकांचाही सहभाग वाढू लागल्याने, सुमारे दहा दिवसांत श्रमदानातून दीडशे ट्रॉली गाळ काढून बंधाऱ्याची खोली व रूंदी वाढवण्यात आली. तसेच गाव विहिरी जवळचा ओढ्याचे जेसीबी च्या सहाय्याने खोदकाम करून, रूंदीकरण करण्यात आले. त्याचबरोबर ओढ्यावर दहा ठिकाणी मोठे कच्चे बंधारे घालण्यात आले. बंधाऱ्यातील गाळ शेतीसाठी वापरण्यात आला. ही सर्व कामे लोकसहभागातून व लोकवर्गणीतून करण्यात आली आहेत.
श्रमदानाच्या पुढील सत्रात :
गावडाग डोंगरातील वाहून जाणारे पावसाचे पाणी आडवण्यासाठी महाश्रमदान राबवून पक्के बंधारे, समतल चरी खोदण्याचे काम व त्यावर वृक्षारोपण करून, परिसर पाणीदार बनवण्याचा निश्चय या तरुणांनी केला आहे.
मच्छिंद्र चिले, अजय दाभोळकर, अनिल चिले, अरूण हिरवे, अविनाश चिले, संदीप दाभोळकर, संदीप चिले, कुशाल चिले, सुरज चिले, प्रताप चिले, शुभम चिले यांनी श्रमदानासाठी सक्रीय सहभाग घेतला असून , रविंद्र घोसाळकर, श्रीकृष्ण चिले, रमेश पोरे आदींचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.

5+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!