‘ विश्वास विद्यानिकेतन ‘ म्हणजे निसर्गाच्या कुशीतील एक ‘ ज्ञानसंकुल ‘
शिराळा : विश्वास विद्यानिकेतन निवासी विद्यालय चिखली म्हणजे उत्तम शैक्षणिक गुणवत्ता, योग्य अनुशासन,आणि मुलांची सर्वांगीण प्रगती, हे समीकरण च झाले असून , इथला विद्यार्थी राज्यस्तरावर खेळामध्ये देखील चमकतो . एवढेच नव्हे तर , इथला दहावी चा निकाल १०० टक्के लागतो. हे केवळ सांगणे नव्हे तर, प्रत्यक्षातील अनुभव आहे, असे अनेक पालक सांगतात.
‘ विश्वास विद्यानिकेतन निवासी शाळा चिखली ‘ या संस्थेला लाभलेला भव्य निसर्गाचा परिसर मुलांना नेहमीच प्रसन्न ठेवतो. इथला गुरुजन वर्ग विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या खेळांचे प्रशिक्षण देखील देतात. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी इथला आहार देखील सकस असतो. पहाट झाल्यापासून सुरु होणारी विद्यार्थ्याची दिनचर्या त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे असलेल्या व्यायामाने होते. तर योगासानांच्या माध्यमातून विद्यार्थ्याची मानसिकतादेखील जपली जाते.
यासाठीच ‘ विश्वास विद्यानिकेतन ‘ म्हणजे निसर्गाच्या कुशीतील एक ‘ ज्ञानसंकुल ‘ म्हणावयास हरकत नाही.