युवकांच्या उज्वल भवितव्यासाठी ‘ येस टेक्नो ‘ : नोकरीची हमी देणारी एकमेव संस्था
मलकापूर : युवकांच्या उज्वल भवितव्यासाठी ‘ येस टेक्नो ‘ या संस्थेने तांत्रिक प्रशिक्षण तरुणांना देवून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं व्रत स्वीकारलं आहे. या संस्थेत तात्रिक प्रशिक्षणासोबत नोकरीचीही हमी दिली जाते. तेंव्हा तरुणांनी तांत्रिक प्रशिक्षण घेवून आपला आर्थिक पाया रचल्यास समाज निश्चितच उन्नत होईल,असे संस्थेचे अमोल गायकवाड यांनी ‘ एसपीएस न्यूज ‘ शी बोलताना सांगितले.
हि संस्था मलकापूर येथे कार्यरत असून, संस्थेचे क्लासरूम, तसेच ‘ प्रात्यक्षिक कक्ष ‘ स्वतंत्र आहे. इथं प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देवून त्यांच्या क्षेत्रात पारंगत केले जाते. या संस्थेत वेगवेगळे ट्रेड उपलब्ध असून आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्याला प्रशिक्षण घेता येईल.शाहुवाडी तालुका दुर्गम आहे. येथील तरुण नोकरीनिमित्त पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी नोकरी साठी जातात,परंतु तांत्रिक प्रशिक्षण नसल्याने चतुर्थ वर्गाची कामे तरुणांना बिनबोभाटपणे करावी लागतात. अशावेळी तांत्रिक प्रशिक्षण मिळाल्यास इथला तरुण आपले कौशल्य दाखवून,चांगले वेतन मिळवू शकतो.
यासाठीच ‘येस टेक्नो ‘ या तांत्रिक प्रशिक्षण संस्था मलकापूर, इथं प्रवेश घेवून आपल्या उज्वल भवितव्याला आजच सुरुवात करा, असे आवाहन प्राचार्य सुशांत कांबळे यांनी केले.