educationalसामाजिक

कोल्हापूर विभागाचा दहावी चा निकाल ९३.८८ %

पुणे : मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून घेण्यात आलेल्या दहावी च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून , राज्याचा निकाल ८९.४१ % लागला आहे.
यंदाच्या निकालात देखील मुलींनी बाजी मारली असून ९१.९७ % विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून ८७.२७ % विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९६ % लागला असून त्यापाठोपाठ कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.८८ %,लागला असून सर्वात कमी नागपूर विभागाचा ८५.९७ % लागला आहे. असे मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांनी सांगितले. राज्यात ४०२८ शाळांचा निकाल १०० टक्के तर ३३ शाळांचा निकाल ० टक्के लागला आहे.
मंडळ निहाय निकाल :
पुणे : ९२.०८,
नागपूर : ८५.९७,
औरंगाबाद : ८८.८१,
मुंबई : ९०.४१,
कोल्हापूर : ९३.८८,
अमरावती : ८६.४९,
नाशिक : ८७.४२,
लातूर : ८६.३०,
कोकण : ९६

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!