बांबवडे एसटी स्टँड कि वडाप स्टँड ?
बांबवडे : बांबवडे एसटी स्टँड कि वडाप स्टँड आहे, हे समजणे दिवसेंदिवस कठीण होवू लागले आहे.
नेहमीच या बांबवडे एसटी स्टँड वर वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. यात यस स्थानकाशेजारीच वादाप्वले आपली वहाने लावून असतात. नियमानुसार स्थानकापासून १०० मीटरच्या बाहेर वहाने लावणे गरजेचे असते. परंतु असे अनेक नियम धाब्यावर बसवून, ‘ वडाप राज्य ‘ पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरु आहे.
काही दिवसांपूर्वीच बांबवडे दूरक्षेत्र पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यापुढे तरी चांगला व्यवहार सुरु होईल, अशी अपेक्षा होती. परंतु ‘ व्यवहार ‘ तर सुरु आहे, पण इतर गोष्टींमध्ये कोणताही बदल झालेला दिसून येत नाही. वाहतुकीची कोंडी आजही सुरु आहे. बांबवडे येथील अंबीरा पुलाचे रुंदीकरण होवूनही कोंडी अद्याप तशीच आहे. याला बेशिस्त पार्किंग कारणीभूत आहे. यासाठी पोलीस खात्यानेच पाऊल उचलणे गरजेचे आहे.