स्वाभिमानीच्या वतीने उदय साखर (अथणी शुगर )ला निवेदन
बांबवडे : उदय सह. साखर कारखाना(सोनवडे) / (बांबवडे )अथनी शुगर युनिट 2 ने गेल्या हंगामात गळीत केलेल्या उसाची एफ.आर.पी.नुसार बिले त्वरित द्यावीत, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अवधूत जानकर, युवा तालुकाध्यक्ष पद्मसिंह पाटील व कार्यकर्त्यांद्वारे अथणी शुगर युनिट २ ला देण्यात आले.
संपलेल्या हंगामातील ऊसाची एफ.आर.पी.नुसार होणारी बिले ऊस उत्पादकांना मिळालेली नाहीत. त्यामुळे विकास सोसायटीची उस बिले थकित आहेत. 30 जून जवळ आल्याने विकास सोसायटयाकडून पिक कर्जाची वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. तसेच नविन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आपल्या पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी अडचणी येत आहेत. शेतकरी आथिर्क अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना खते आणण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत. यासाठी कारखान्याला 2017-18 साली शेतकऱ्यांनी गाळपासाठी पाठवलेल्या ऊस बिलाच्या एफ.आर.पी.नुसार होणाऱ्या फरकाची रक्कम एकरकमी त्वरित मिळावी. या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अथनी शुगर युनिटचे चिफ अकाउंट सुजित पाटील यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे युवा आघाडी तालुका सरचिटणीस तानाजी रवंदे, शिवाजी पाटील, सुनील पाटील, व कार्यकर्ते उपस्थित होते.