‘ संजय ‘ म्हणजे एका झंझावाताची ‘ प्रेमळ झुळूक ‘ : रक्षाविसर्जन बुधवार दि. २७ जून

बांबवडे : माणसाच्या जीवनात कधी कोणता प्रसंग येईल, हे सांगता येत नाही. नेहमीच हसतमुख असलेलं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलेलं, आपण अनुभवत आहोत. संजय महादेवराव पाटील साळशीकर ,या व्यक्तीचा अचानक थांबलेला जीवनप्रवास आज प्रत्येकालाच चटका लावणारा ठरला आहे. मृत्यू नंतर चे सोपस्कर पाटील कुटुंबीय करत आहेत. त्यापैकी रक्षाविसर्जन हा आजचा विधी आहे. अनेक नातेवाईक, मित्रमंडळी आप्तेष्ट आज संजय यांना अखेरचा निरोप देत आहेत.
संजय पाटील हे एक हसतमुख व्यक्तिमत्वं होतं. काहीही झाले तरी संजय हे सदाबहार व्यक्तिमत्व होतं. आज अनेक सामाजिक कामात संजय यांचा मोलाचा वाटा आहे . त्यांचे वडील कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती होते. त्यांच्या अनेक ऊन -पावसात त्यांच्या पाठीशी ठामपणे संजय व त्यांचे बंधू उभे असायचे. वडिलांचा एक आज्ञाधारक मुलगा म्हणून त्यांचा जीवनप्रवास सुरु होता.
गतवर्षी असाच त्रास झाला, म्हणून औषधोपचार झाले. त्यानंतर मात्र संजय व्यवस्थित झाले. आणि आज अचानकपणे काळाच्या पडद्याआड गेलेलं, आपलं लेकरू पहात असताना, वडिलांच्या आत्म्याने आतल्या आत टाहो फोडला असेल. करणा जिल्हापरिषद मध्ये खंबीर नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व तुमच्या-आमच्या सारखं रडून मोकळं होवू शकत नाही.
संजय म्हणजे एका झंझावाताची हलकी प्रेमळ झुळूक होती. ज्या झंझावाताने आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग पहिले, त्या झंझावाताचा हे एक शांत प्रपात होते. आज संजय पाटील अनंतात विलीन झाले. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात ” साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज ” आणि परिवार सहभागी आहोत. त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, हीच प्रार्थना….

1+

Mukund Pawar

Editor

One thought on “‘ संजय ‘ म्हणजे एका झंझावाताची ‘ प्रेमळ झुळूक ‘ : रक्षाविसर्जन बुधवार दि. २७ जून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!