घाटकोपर परिसरात चार्टर्ड विमान कोसळल्याने पायलट सह चौघे व इतर एक अशा पाच जणांचा मृत्यू
मुंबई : येथील घाटकोपर च्या परिसरात उत्तर प्रदेश सरकारचे चार्टर्ड प्लेन कोसळले असून,या दुर्घटनेत विमानातील चौघांचाही मृत्यू झाला आहे. तसेच एका पादचाऱ्याचा हि मृत्यू झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश सरकारचं चार्टर्ड विमान दीड वाजनेच्या सुमारास घाटकोपर परिसरात कोसळले. या विमानातून पायलट सह चौघे जण प्रवास करत होते. ह्या चौघांचाही मृत्यू झाला आहे. तसेच याचबरोबर एका पादचाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. यावेळी याठिकाणी अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी पोहचली असून, परीस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु आहेत.
घाटकोपर परिसरात अनेक रहिवाशी परिसर आहे. परंतु प्रसंगावधान राखून पायलट ने बिल्डींग, घरे नसलेल्या परिसरात विमान उतरवण्याचा प्रयत्न केल्याने जीवितहानी अधिक घडलेली नाही.