शाहूकालींन चहामळ्याच्या संवर्धनासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : अनिल कंदूरकर

पैजारवाडी प्रतिनिधी :-
ऐतिहासिक अशा शाहूकालींन चहामळ्याच्या संवर्धनासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन पं. स. सदस्य अनिल कंदूरकर यांनी जेऊर (ता.पन्हाळा )येथील शाहूकालीन चहा माळ्यात शाहू जयंती कार्यक्रमात बोलताना केले.
ग्रामपंचायत जेऊर, तात्यासाहेब कोरे ग्रंथालय, आणि पन्हाळा-शाहूवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही शाहू जयंती साजरी करण्यात आली.
डोंगर आणि अविकसित भागात ग्रामीण लोकांना रोजगार निर्माण व्हावा, तसेच पडीक जमिनीवर हरितक्रांती व्हावी, या बहुउद्देशीय हेतूने शाहू महाराजांनी निर्माण केलेली व इंग्रज काळात इंग्लडमध्ये प्रसिद्ध पन्हाळा पोर्ट टी नावाने विकला जात असलेल्या या चहा मळ्याची पडझड होऊन कालांतराने दुर्लक्षित झाला आहे. अशा या चहा मळ्याचे संवर्धन व जतन होणे गरजेचे असल्याने, त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार संभाजीराजे यांच्याकडे आपण पाठपुरावा करणार व या चहा मळ्याचे संरक्षण, तसेच पर्यटन दृष्टीने विकास होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, श्री कंदूरकर यांनी सांगितले.
यावेळी भैरवनाथ दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब खांडेकर, श्रीकृष्ण सोसायटीचे व्हा. चेअरमन विलास पोवार, पन्हाळा शाहूवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णात हिरवे, महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट पन्हाळा चे सरचिटणीस उत्तम महाडिक, माजी ग्रा. पं. सदस्य दत्तात्रय बोबडे, अरविद डावरे, जयंसिग खांडेकर, वसंत वरेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक पुणे विभाग ग्रंथालय संघाचे संचालक भीमराव पाटील तर आभार विनोद साठे यांनी मानले.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!