अंधेरी येथील गोखले पूल कोसळला : चालक सावंत यांच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी वाचली

मुंबई : अंधेरी येथील रेल्वे रुळावरून जाणारा गोखले पूल सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान कोसळला. परंतु पश्चिम रेल्वे चे मोटर मॅन चंद्रशेखर सावंत यांच्या प्रसंगावधानामुळे शेकडो मुंबईकरांचे प्राण आज वाचले आहेत.
पश्चिम रेल्वे च्या लोकल ट्रेन ने अंधेरी स्टेशन सोडले होते. काही अंतर गेल्यानंतर मोटर मॅन चंद्रशेखर सावंत यांना पुढील गोखले पूल कोसळताना दिसला, आणि त्यांनी तत्काळ गाडीचे ब्रेक लावले. त्यामुळे लोकल थांबली, आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. या अगोदर नुकतीच विरार -चर्चगेट ट्रेन निघून गेली होती. केवळ चंद्रशेखर सावंत यांचे प्रसंगावधान आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणूनच होणारी मोठी दुर्घटना टळली.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!