” बांबवडे व्यावसायिक वेल्फेअर असोसिएशन ” चे उद्घाटन पोलीस निरीक्षक मनोहर रानमळे यांच्या हस्ते संपन्न

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या बांबवडे व्यापारी संघटनेचं अधिकृत अशा बांबवडे व्यावसायिक वेल्फेअर असोसिएशन या नावाने नोंदणी करण्यात आली आहे. यांचा नोंदणी क्रमांक १६८/१८ असा आहे. याचे औपचारिक उद्घाटन शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर रानमळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक रानमळे, संघटनेचे अध्यक्ष रवींद्र फाटक, बाळासाहेब खुटाळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक मनोहर रानमळे साहेब म्हणाले कि, इथला व्यापारी केवळ व्यापार करत नसून,सामाजिक उपक्रमात देखील सहभागी असतो, हे कौतुकास्पद आहे. दरम्यान व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर अस्ताव्यस्त पार्किंग वाहनधारकांना करून देवू नये. तसेच आपल्या दुकानांमध्ये सीसी टिव्ही कॅमेरा बसविण्याचे आवाहन सुद्धा रानमळे यांनी केले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र फाटक म्हणाले कि, व्यावसायिकांची एकी असणे हि काळाची गरज आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना विचारात न घेता घेण्यात येणाऱ्या निर्णयांना आपल्याला विरोध करता येईल. तसेच एखादा व्यापारी अडचणीत आल्यास त्यास सर्व जण मिळून शक्यतो सहकार्य करता येईल.
यावेळी बाळासाहेब खुटाळे यांनी देखील आपल्या मनोगतात व्यापाऱ्यांना गरजेची असलेली एकी आपण या संघटनेच्या माध्यमातून उभी करतोय, असे सांगितले.
यावेळी सरपंच सागर कांबळे , प्रकाश पाटील आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक रुद्राप्पा बाऊचकर,होते. तर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत यम्मेवार, उपसरपंच सयाजी निकम, विष्णू यादव, सुरेश नारकर, अभयसिंह चौगुले, सचिन मूडशिंगकर , दत्तात्रय यादव, विद्यानंद यादव,आदी मान्यवर, व व्यावसायिक उपस्थित होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!