पत्रकारितेत धडपडणाऱ्या बापाच्या लेकीचं अत्युच्च यश ..

बांबवडे : एक मुलगी आयुष्यभर आपल्या आईवडिलांच्या सांगण्यानुसार वागत आली. आणि आज इंजिनिअर झाली. आयुष्यभर केलेल्या अभ्यासाचं हे एक सगळ्यात मोठं फळ होतं.
दहावी पास झाल्यानंतर डिप्लोमा ला अॅडमिशन घेतलं. आणि एक नवा प्रवास सुरु झाला. तिला हॉस्टेल मध्ये सोडताना जडवलेली पावलं, तिच्या कुटुंबाला साखळदंड अडकवल्यासारखं झालं होतं. बापाचं काळीज हृदय फोडून बाहेर आलं होतं. पण मुलीच्या भवितव्यासाठी हृदयावर दगड ठेवला,आणि सुरु झाली तिच्या नव्या आयुष्याला. डिप्लोमाला यश मिळालं,आणि डिग्री कडे पावलं वळली.
दोन मुलांचा खर्च झेपणारा नसला, तरी दोन्ही मुळे बावन्नकशी सोनं असली,कि, बापाला आणि आईला दहा हत्तींचं बळ येतं. नेमकं तेच झालं. परिस्थिती नसतानाही मुलीला ‘ इंजिनिअर ‘ या पदवी साठी अॅडमिशन घेतलं. न पेलवणारं शिव धनुष्य उचललं, आणि त्याचा आनंद आज समोर आला आहे. शब्द अपुरे पडतील,असे हे यश निश्चितच आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादामुळे मिळालं आहे. माझ्या दोन्ही लेकरांच्या पाठीशी, आपण असेच उभे रहावे हीच अपेक्षा. आपल्याला ती मुलगी कोण ? असा प्रश्न पडला असेल. ती मुलगी आहे, तृप्ती मुकुंद पवार. एका अभ्यास करणाऱ्या ओंकार नावाच्या भावाची लहान बहिण. ग्लोबल कॉम्प्यूटर टायपिंग इन्स्टिट्यूट च्या प्राचार्या मंजिरी मुकुंद पवार यांची कन्या. समस्त पवार बंधू यांची आवडती लेक, आवडती बहिण, आवडती पुतणी. आणि एका पत्रकारितेत धडपडणाऱ्या मुकुंद पवार नावाच्या बापाची लाडकी लेकं.
आपल्या सगळ्यांचे खूप धन्यवाद.

17+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!