स्वाभिमानी संघटनेच्या शाहुवाडी तालुका सरचिटणीस पदी तानाजी रवंदे
शाहूवाडी : शाहुवाडी तालुका कृती समिती चे अध्यक्ष तानाजी रवंदे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. दरम्यान या अनुषंगाने त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाहुवाडी तालुका युवा आघाडी च्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाहुवाडी तालुका संपर्कप्रमुख व युवा जिल्हा अध्यक्ष सागर शंभू शेटे, तालुका अध्यक्ष वसंत पाटील, यांच्या नेतृत्वाखाली शाहुवाडी तालुका सरचिटणीस पदाची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.