येत्या आठ दिवसात शून्य शिक्षक शाळांना शिक्षक :उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचे “स्वभिमानी” ला आश्वासन
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरती संदर्भात येथील गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा अल्टिमेटम स्वाभिमानी ने दिला होता. त्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कोल्हापूर जिल्हापरिषद मध्ये गेले असता, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित नव्हते. तेंव्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर संघटनेने ठिय्या आंदोलन केले. व त्यांच्या आश्वासनानंतर निवेदन सादर केले. यावेळी प्रथम शून्य शिक्षक असलेल्या शाळांना शिक्षक येत्या आठ दिवसात देवू, असे आश्वासन स्वाभिमानी संघटनेला दिले आहे.
यावेळी स्वाभिमानी युवा संघटनेचे अध्यक्ष सागर शंभू शेटे, तालुकाध्यक्ष वसंत पाटील ,युवा तालुकाध्यक्ष अवधूत जानकर, पद्मसिंह पाटील, तानाजी रवंदे, सुरेश म्हाऊटकर, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘