” पायल ” वडिलांच्या हृदयातील एक सोनेरी पान हरपलं….
बांबवडे : तुरुकवाडी तालुका शाहुवाडी येथील घटना…
मुलगी म्हणजे कुटुंबाच्या हृदयातील एक गोड जागा. आणि वडिलांच्या हृदयातील एक सोनेरी पान. आयुष्यभर या हृदयातील जागेला कष्टाने जपलेलं असतं. पण नियतीचा खेळ न्याराच असतो. जे आपलं असतं तेच नेमकं नियतीच्या हृदयात जावून बसतं. आयुष्याच्या या खेळात आजवरी नियतीचाच विजय झालेला आपण पहात आलेलं असतो. नेमकं हेच झालं तुरुकावाडीत. असा एक क्षण आला ज्यानं, वडिलांच्या काळजावर घाव घातला. पायल हि तुरुकवाडी चे माजी सरपंच संजय माईंगडे यांची मुलगी होती. तिचा आकस्मिक मृत्यू झाला आणि अवघ्या कुटुंबाने हंबरडा फोडला. पायल हि विघ्नहर्ता रोडलाइन्स, विघ्नहर्ता चॅरिटेबल ट्रस्ट,व विघ्नहर्ता समूहाचे अध्यक्ष सर्जेराव माईंगडे यांची पुतणी.
पायल चे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर तुरुकवाडी इथं झालं.तर पुढील शिक्षणासाठी तिने कोतोली च्या हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला. तिचा आठवीचा प्रवेश हायस्कूल साठी सांस्कृतिक पर्वणीच होती. कारण पायल नृत्य कलेत निपुण होती. सातवी पर्यंत शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमातून तीनं आपली जागा दाखवून दिली होती. परंतु अशाच वेळेत सगळ्यांच्या आवडत्या विद्यार्थिनीने घेतलेली एक्झिट, म्हणजे तुरुकवाडी परिसराला बसलेला आकस्मिक धक्काच होता.
संपूर्ण माईंगडे कुटुंबियांच्या दुःखात साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवार सहभागी आहे. पायल च्या आत्म्यास ईश्वर शांती देवो,हीच प्रार्थना.