अभिराज बिल्डर्स चे मालक ‘ सुरेशजी कोळगे सर ‘ यांचे आकस्मिक निधन : उद्या दि.१५ जुलै रोजी अंत्यसंस्कार
बांबवडे : कोतोली पैकी पाटीलवाडी तालुका शाहुवाडी येथील सुरेशजी बाळकू कोळगे (सर )वय ५२ वर्षे याचे मुंबई येथे हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव उद्या दि.१५ जुलै रोजी कोतोली इथं आणण्यात येणार असून त्यांच्यावर उद्या दि.१५ जुलै रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अभिराज बिल्डर्स नावाने मुंबई इथं नावारूपाला आलेले कोळगे सर समाजाप्रती सुद्धा विनयशील होते. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा मोलाचा सहभाग होता. कानसा खोऱ्यात त्यांचा फार मोठा चाहता वर्ग आहे.
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने सुरेशजी कोळगे सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.