शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान जमा व्हावे,यासाठीच दुध रोको आंदोलन : पद्मसिंह पाटील
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातून दुधाचा थेंब बाहेर जावू देणार नाही. दुध उत्पादक आणि शेतकरी यांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी ,आणि झोपलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कटीबद्ध आहे. यासाठी सर्व शेतकरी वर्गाने या आंदोलनात सहभागी व्हावे,असे आवाहन हि स्वाभिमानी संघटनेचे तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष पद्मसिंह पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
आज दि. १६ जुलै पासून मोठ-मोठ्या शहरांना होणारा दुध पुरवठा स्वाभिमानी संघटनेच्या वतीने रोखला जाणार आहे. यासाठी या अगोदरच शेतकरी बांधवांमध्ये या आंदोलनाबद्दल जनजागृती केली आहे. दुधाच्या भुकटी ला तसेच दुधाला प्रती लिटर ५ रुपये अनुदान मिळावे, तसेच ते अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्याला वर्ग व्हावे.यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. आणि शेतकरी सुद्धा यासाठी तयार आहे. या आंदोलन काळात येणारे दुध दुध डेअरी तसेच दुध संकलन केंद्रांना न घालता आपल्या मुलाबाळांसाठी ठेवण्याचे तसेच देव-देवतांना अभिषेक करावेत,जेणेकरून शासनाला देव सुबुद्धी देवो, अशाप्रकारचे भावनिक आवाहन देखील शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी स्वाभिमानी चे कोल्हापूर जिल्हा युवा आघाडीचे उपाध्यक्ष अवधूत जानकर, शाहुवाडी तालुका युवा आघाडी अध्यक्ष पद्मसिंह पाटील ,शाहुवाडी तालुका अध्यक्ष जयसिंग पाटील, उपाध्यक्ष अमर पाटील, विद्यार्थी परिषद तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, सतीश पाटील साळशी , शिवाजी पाटील सावे , अनिल पाटील डोणोली , शाखाप्रमुख अक्षय पाटील, उत्तम पाटील, दत्तात्रय जानकर, योगेश बेंद्रे, राजेंद्र पाटील रेठरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.