कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य : ग्रामस्थांचे आंदोलनाचे इशारे
बांबवडे : कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा निषेध म्हणून डोणोली तालुका शाहुवाडी इथं, उदय साखर चे संचालक पंडित शेळके सर व ग्रामस्थांनी खड्ड्यातच वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला आहे.
अशीच परिस्थिती बांबवडे स्थानक, ग्रामपंचायत कार्यालय अशा अनेक ठिकाणी दिसून येत असूनहि, शासकीय खाते अद्याप निद्रावस्थेत आहे. मुख्य म्हणजे या महामार्गाची गेल्या दोन महिन्यापूर्वीच डागडुजी झाली होती. ह्या गोष्टी नेहमीच्याच असून ठेकेदार कंत्राट आपल्या पदरात पडून घेण्यासाठी, एप्रिल च्या सुरुवातीला गडबडीने कामे आटोपून घेतात. आणि हीच कामे पहिल्याच पावसात धुवून जातात. हि बाब नित्त्याचीच झाली असून, लोकप्रतिनिधी सुद्धा या बाबतीत मुग गिळून गप्प का असतात? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.
दरम्यान लवकरात लवकर ह्या कामांची दुरुस्ती झाली नाही, तर उग्र आंदोलन करण्यात येईल, असे बांबवडे ग्रामपंचायत चे सरपंच सागर कांबळे, व उपसरपंच सयाजी निकम यांनी ‘ एसपीएस न्यूज ‘ शी बोलताना सांगितले.