…अशा दुधात किती पाणी असते,ते मला माहित आहे : कृषिमंत्री नाम.खोत ,तर खास.शेट्टी मागणीवर ठाम
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेले आंदोलन शेतकऱ्यांसाठी नसून निवडणुकांसाठी आहे. अशी खरमरीत टीका राज्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली आहे.
आज राज्यभर सुरु झालेल्या दुध बंद आंदोलनाचे पडसाद उमटत असून, अनेक ठिकाणी दुध रस्त्यावर ओतून दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर नामदार खोत यांनी हि टका केली आहे.
एकेकाळची स्वाभिमानी संघटनेची धगधगती तोफ आज संघटने कडेच तोंड करून भडीमार करू लागली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना नामदार खोत म्हणाले कि, अशा आंदोलनातील दुधात किती पाणी आहे, हे मला माहित आहे, कारण मी सुद्धा याच आंदोलनातून पुढे आलो आहे.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी ,हे आपल्या मतावर ठाम असून दुधाला ५ रुपये अनुदान देण्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात घोषणा करावी, त्यानंतरच आंदोलन मागे घेतले जाईल, असे ठामपणे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.