‘ कोल्हापूर हायकर्स ‘ कडून पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती
कोडोली प्रतिनिधी :
साधारण पणे ६०० वर्षे मुस्लिम राजवटीने आपल्या देशावर राज्य केलं. या प्रचंड गुलामगिरीच्या काळात, स्वराज्याचं स्वप्न बघणं, आणि ते अस्तित्वात आणण, हे काम छत्रपती शिवरायांनी केलं. त्यांच्या या कार्यात त्यांना खंबीर साथ दिली ती मराठमोळ्या मावळ्यांनी, आणि सह्याद्री च्या गडकोटांनी. त्या पैकीच एक पन्हाळगड , या गडावर राजांना गडाभोवती वेढा टाकून शत्रू सेनेकडून, बंदी बनवण्यात आलं होतं. तेव्हा वीर शिवा काशीद यांनी आणि बाजी प्रभू देशपांडे यांनी स्वतः च्या जिवाचं बलिदान देऊन राजांना सुखरूप बाहेर काढलं होतं, आणि राजांनी विशाळगडाकडे कुच केली होती. या ऐतिहासिक घटनेला उजाळा म्हणून आज ‘ कोल्हापूर हायकर्स ग्रुप ‘ च्या वतीनं पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहीम आयोजित केली होती. २ दिवस चालणाऱ्या या मोहिमेची सुरुवात आज नेबापुरातींल शिवा काशीदांचे समाधी पासुन झाली.
आज च्या युवकांना छत्रपती शिवराय त्यांचा इतिहास, त्यांच्या मोहिमा, मावळे, गडकिल्ले,आदींची माहिती व्हावी, म्हणून कोल्हापूर हायकर्स ग्रुप च्या वतीनं पन्हाळा पावनखिंड मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं .
यावेळी कोल्हापूर हायकर्स चे अध्यक्ष सागर पाटील यांनी आपल्या मोहिमेबाबत सांगितले कि, नेबापुरातींल वीर शिवा काशीदांचे समाधीचे पूजन करून या मोहिमेला सुरूवात झाली. पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल आणि इतिहास संशोधक अमर आडके यांच्या हस्ते या मोहिमे ला सुरुवात झाली. आज पासून २ दिवस चालणाऱ्या या मोहिमेत साधारण पणे २०० शिव प्रेमी सहभागी झाले असून, आज सकाळी १० वाजता या मोहिमे ला सुरुवात झाली. या मोहिमेची सांगता पावनखिंडी मध्ये उद्या दुपारी होणार आहे.
या वेळी कोल्हापर हायकर्स चे श्रीकांत पाटील, प्राची पाटील, नीता पाटील, यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.