जिल्ह्यातील विविध शाळांना ‘ मोबाईल सायन्स एक्झिबिशन व्हॅन ‘ भेट देणार

वारणा प्रतिनिधी:-
लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सर्वसामान्य जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने नेहरू सायन्स सेन्टर, मुंबई, WSIAC’s Science Club (विज्ञान प्रसार नेटवर्क क्लब शी सलग्न) आणि वारणा विज्ञान केंद्र, वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू सायन्स सेन्टरची मोबाईल सायन्स एक्झिबिशन व्हॅन आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळांना भेट देत आहे. बुधवार दि. १८ जुलै ते मंगळवार दि. ११ ऑगस्ट या दरम्यान सदर मोबाईल सायन्स एक्झिबिशन सर्व तालुक्यातील काही प्रमुख शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक भेटींसाठी मोफत उपलब्ध केली जाणार आहे.
या प्रदर्शनात न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, वायुमंडलीय दबाव, बल, गुरुत्व, घर्षण, प्रकाशाचे गुणधर्म, मालिका आणि समांतर परिपथ या सारख्या बऱ्याच संकल्पना, उपकरणांच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडल्या जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागाने वेगवेगळे वैज्ञानिक उपक्रम केले जाणार आहेत.
सदर प्रदर्शनाचे परिपत्रक कोल्हापूर जिल्हा शिक्षण उप-संचालक तथा जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा. किरण लोहार यांच्यावतीने सर्व शाळांना पाठविण्यात आले आहे.
सदर व्हॅनचे उद्घाटन माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते वारणा विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले.
कृतीतून विज्ञानचे धडे गिरवण्यासाठी वारणा संकुलाने वारणा विज्ञान केंद्राची निर्मिती करून परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे काम या पूर्वीच केले असून, या कामाचा पुढील भाग म्हणून, या केंद्राच्या वतीने व नेहरू सायन्स सेन्टरच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यासाठीचा व्हॅन दौराआयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील लहान मुलांमध्ये कल्पकता निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल, असे अधोरेखित करताना भविष्यात वारणा परिसरातून अनेक शास्त्रज्ञ उदयास येतील, अशी अपेक्षा यावेळी विनयजी कोरे यांनी व्यक्त केली.
सदर प्रसंगी, डॉ. सौ. वासंती रासम , प्रशासकीय अधिकारी, श्री. वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर, डॉ. जॉन डिसोझा, प्रिन्सिपॉल कोऑर्डिनेटर, वारणा विज्ञान केंद्र, सायंटिफिक ऑफिसर प्रा. एस. एस. पाटील, प्रा. एस. एच. मोरे, प्रा. पी. एस. कुंभार, प्रा. पी. डी. लोले, वारणा विद्यालयाचे मुख्याध्यापक मलमे सर, विलासराव कोरे इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक देसाई सर आदी उपस्थित होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!