आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पेट्रोल ४ रु.स्वस्त, विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोडोली प्रतिनिधी:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोडोली (ता.पन्हाळा) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त चार रुपये पेट्रोल कमी दराने देऊन व विविध उपक्रमांनी साजरी करणार असल्याची माहिती मनसे जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वातंत्र्य पुर्व काळात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेला राष्टीय दर्जा मिळणेकरिता पोवाडा व लोकनाट्यातून समाज प्रबोधन केले होते. या करिता त्यांना अभिवादन करण्याकरिता कोडोली मनसे तर्फे १ ऑगस्ट रोजी सकाळी वारणा तालमीजवळील आर. पी. पाटील यांच्या हिंदुस्थान पेट्रोल पंपावर फोटोचे पूजन करून या पेट्रोल पंपावर सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पेट्रोल ४ रुपये स्वस्त देणार आहे. तसेच सकाळी १० ते १ डॉग रेस आयोजित करण्यात आली आहे. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता दत्त मठी पासून पारंपरिक पद्धतीने सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती संतोष जाधव यांनी सांगितले. यावेळी शहर अध्यक्ष रमेश मेनकर, तालुका अध्यक्ष नयन गायकवाड, अजय दाभाडे, विक्रम गोसावी, जमीर मुल्ला यांचा बरोबर पेट्रोल पंप मालक आर. पी. पाटील व प्रकाश पाटील व कोडोली मानसे कार्यकर्ते उपस्थित होते..