सामाजिक

पन्हाळा येथील भूस्खलन तीव्रता वाढली

कोडोली प्रतिनिधी : ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या पायथ्याला बुधवार पेठ नेबापूर ,या परिसरात काल झालेल्या भूस्खलनाची तीव्रता आता वाढली असून काल तडा गेलेली शाळेची इमारत आता भांगु लागली आहे. जवळच्या काही घरांना ही तडे गेले आहेत. एकूणच हा परिसर अधिक संवेदनशील होत चाललाय.
काल पन्हाळ गडाच्या पायथ्याला नेबापूर मध्ये भूस्खलन झालंय. तिथल्या शाळेच्या इमारतीला काल तडे गेले होते ,त्या तड्यांचं रूपांतर आता भेगा मध्ये होऊ लागलंय. जमिनीच्याही भेगा अधिक रुंदावल्या आहेत.काल काही इंच रुंदीच्या भेगा आता फूट भर रुंदीच्या झाल्या आहेत.शाळेच्या इमारती बरोबरच काही लोकांच्या घराला ही तडे जाऊ लागले आहेत.मुहंमद काझी यांच्या घराला ही तडे गेले आहेत.तसेच डोंगर भागात ही तडे गेले आहेत. याबाबत खबरदारी म्हणून भु वैज्ञानिकांच्या भेटी नंतर तालुका प्रशासनानं या परिसरात खाजगी लोकांना आणि पर्यटकांना बंदी केली आहे.नागरिकांना सतर्क रहाण्याचे विशेषतः रात्री च्या वेळी सुरक्षित ठिकाणी झोपण्याची विंनती केली आहे.
दरम्यान या सगळ्या प्रकाराला इथ झालेलं बेकायदेशीर उत्खनन जबाबदार असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं असून याबाबत तालुका प्रशासन काय भूमिका घेत आहे ,या बाबत विचारले असता , श्री गुरव यांनी तहसील कार्यालयांने संबंधित बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या लोकांना यापूर्वीच नोटीस बजावून त्यांना दंड ही केला असल्याचं सांगितलं. तसेच भु वैज्ञानिकाच्या अहवालानंतर योग्य ती कारवाही केली जाईल असे ही सांगितले .नेहमीच होणाऱ्या या घटना थांबवण्यासाठी भूवैज्ञानिक अहवाल नंतर उत्खननास सक्त मनाई केली पाहिजे.आणि उत्खनन करायचेच असेल तर योग्य त्या विभागाची परवानगी घेतली पाहिजे.आणि या सर्व बाबींची काटेखोर तपासणी तहसील विभागानं करायला पाहिजे. फक्त बेकायदेशीर उखननाचा दंड पुरेसा नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!