पन्हाळा भूस्तरखलन : कुंभार समाज प्रतिक्रिया
पन्हाळा प्रतिनिधी :
ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पायथ्याला नेबापूर मध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी भूस्तखलन झाले असून, हे भूस्तरखलन येथील गटनंबर १०२ मध्ये उत्खनन केल्याने झालं असल्याचा प्राथमिक अंदाज येथील काही नागरिक वर्तवत होते. याबाबत कुंभार समाजाचं म्हणणं आहे की, गट नंबर १०२ आमच्या मालकीचा असून, आम्ही इथं कोणतेच उत्खनन केलं नसून, उलट येथील खड्डा मुजवण्यासाठी बाहेरून मुरूम आणून सखल भागात टाकलाय. त्यामूळे या भूस्तरखलनामागे कुंभार समाज दोषी नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
अशा प्रकारचे भूस्तरखलन यापरिसरात नेहमीचं होत असतंय, आणि याप्रकाराला तिथली मृदा आणि अतिवृष्टी जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे..