सुराज्य फौंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘व्हिजन २०१८ ‘ आयोजन
पन्हाळा वार्ताहर
ग्रामीण विद्यार्थ्यांची केंद्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परिक्षेची भीती कमी व्हावी, त्यांच्या मनात या स्पर्धां विषयी आवड निर्माण व्हावी , या उद्देशाने वारणानगर येथील सुराज्य फौंडेशनच्या वतीनं व्हिजन २०१८ , या समारंभाचे आयोजन दर वर्षी करण्यात येतं. या वर्षीच्या या समारंभाचं आयोजन दिनांक २८ जुलै रोजी करण्यात आलंय, या बाबतची माहिती सुराज्य फाउंडेशन चे अध्यक्ष एन,एच,पाटील सर यांनी वारणानगर येथील पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी एन.एच.पाटील सर यांनी सांगितले कि, वारणा नगर इथं सुराज्य फौंडेशन च्या वतीनं गेली 18 वर्षे केंद्रीय स्पर्धा परिक्षेमध्ये यश प्राप्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांचं मनोगत ऐकणं, यासाठी हा समारंभ आयोजित केला जातो. या वर्षीच्या ‘ व्हिजन २०१८ ‘ या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक २८ जुलै रोजी करण्यात आलं असून, या समारंभात साधारण पणे ३० गुणवंत समाविष्ट होणार आहेत. तसेच यशस्वींना वारणा परिवाराच्या वतीनं माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन,एच,पाटील यांनी वारणांनगर इथं पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बी टी साळोखे, बी टी पायमल, जीवन शिंदे, दिनेश पाटील, संदीप इंगळे आणि किशोर पाटील आदी उपस्थित होते.