बांबवडे त ‘ महाराष्ट्र बंद ‘ ला कडकडीत ‘ बंद ‘ पाळून मोठा प्रतिसाद
बांबवडे : मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने पुकारलेल्या ‘ महाराष्ट्र बंद ‘ ला बांबवडे आणि पंचक्रोशीतून कडकडीत बंद पाळून पाठींबा देण्यात आला. यावेळी सर्व पक्ष आपले राजकीय अस्तित्व विसरून या ‘ बंद ‘ मध्ये सहभागी झाले होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारली. मराठा आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती रद्द करावी,या मागणीसाठी पुकारलेल्या जलसमाधी आंदोलनात या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला . याच्या निषेधार्थ ‘ महाराष्ट्र बंद ‘ ची आज हाक देण्यात आली होती. त्याला शाहुवाडी तालुक्यातून पाठींबा दर्शविण्यात आला. यावेळी घोषणा हि देण्यात आल्या.
यावेळी बांबवडे इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बांबवडे व्यापारी,व व्यावसायिक वेल्फेअर असोसिएशन,व ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. किसन लोहार, मनसे चे तालुकाध्यक्ष कृष्णात दिंडे, महादेव मुल्ला, सतीश तेली, विजय परीट, शिवसेनेचे सचिन मुडशिंगकर, सारंग पाटील, विजय लाटकर, अक्षय निकम, स्वाभिमानी संघटनेचे सुरेश म्हाऊटकर, मराठा महासंघाचे सुनील पाटील, व्यापारी असोसिएशन चे रवींद्र फाटक, प्रकाश खुटाळे, अर्जुन निकम, महेश पाटील, व सर्व पक्षाचे कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.