बांबवडे तील कोळेकर,निकम मित्रांची खाकी वर्दी आणि आरोग्य यंत्रणेविषयी कृतज्ञता, भटक्या समाजाविषयी जिव्हाळा

बांबवडे :  कोरोना रोगाच्या फैलावामुळे १४ एप्रिल २०२० पर्यंत ‘ लॉक डाऊन ’ घोषित केला आहे. त्यामुळे आरोग्य आणि पोलीस यंत्रणेवर प्रचंड तान आला आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तहानभूक विसरून आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी मंडळींना बांबवडे तालुका शाहुवाडी येथील गजेंद्र कोळेकर,विजय निकम आणि मित्र परिवार यांनी खाण्याचे पाउच आणि पाण्याची बॉटल देवून आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता

बांबवडे तालुका शाहुवाडी येथील पोलीस दूरक्षेत्र चौकी इथं कोळेकर आणि निकम मित्र परिवाराने आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. कारण आपल्या तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. अशावेळी मोजकी कुमक आणि मराठा बटालियन चे जवान सोबत घेवून लॉक डाऊन पाळण्यासाठी लोकांना कोरोना पासून वाचविण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा यशस्वी प्रयत्न करीत आहेत.

याचबरोबर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी देखील या कोरोना पासून लोकांना वाचविण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत. एकही सुट्टी न घेता हि मंडळी समाजासाठी ढाल बनून  लढत आहेत. अशा सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना समाजाच्यावतीने या मित्र परिवाराने सलाम केला आहे.

यावेळी सहा.पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, सहा.पोलीस निरीक्षक शैलजा पाटील, पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, राहुल म्हस्के, सनीराज पाटील, बाबासो चौगुले, उत्तम बुरुगडे, माणिक पाटील, संजय काशीद, सौ. अश्विनी कांबळे, नंदिनी राजेंद्र शिंदे, मराठा बटालियन चे जवान साकार राळे, सत्यजित पाटील, पुष्पराज जाधव, मंगेश भद्रे, पोलीस पाटील संजय कांबळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

गजेंद्र कोळेकर, विजय निकम यांच्यासोबत मंगेश घोडके, प्रशांत यादव, आणि मित्र परिवार यांनी पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

यावेळी आरोग्य कर्मचारी धनाजी लोहार, मोहिते,परिचारक,परिचारिका यांना सुद्धा हे पाऊच वाटून डॉक्टर,परिचारक, परिचारिका आणि कर्मचारी यांच्याविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

डवरी समाजाविषयी जिव्हाळा …

 याचबरोबर नाथपंथी डवरी समाजालादेखील त्यांनी मारलेल्या झोपडीवजा पालात जावून, खाण्याचे पाऊच, पाण्याच्या बाटल्या, सहा.पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्याहस्ते देण्यात आल्या. यावेळी खऱ्या अर्थाने काळीज पिळवटून टाकेल अशी परिस्थिती पहावयास मिळाली. भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजाला बांबवडे तील मित्र परिवाराने केलेली मदत निश्चितच स्पृहणीय आहे.

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!