बांबवडे इथं निर्जंतुकीकरण कक्ष : जि.प. स. विजयराव बोरगे

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर निर्जंतुकीकरण कक्ष निर्माण करण्यात आले आहे. हे निर्जंतुकीकरण कक्ष जिल्हापरिषद सदस्य विजयराव बोरगे यांच्या निधीतून निर्माण करण्यात आले आहे. सध्याची कोरोना रुग्णांची तालुक्यातील लागण पाहता हे कक्ष काळाची गरज होवू लागली आहे.

या कक्षामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या दृष्टीने अत्यावश्यक गरज होती. त्याचबरोबर इतरांनाही या कक्षाचा वापर होणार आहे.

अशाच प्रकारचे आणखी एक कक्ष प्राथमिक आरोग्य केंद्र बांबवडे इथं निर्माण करण्यात येत आहे. अशी माहिती जि.प. सदस्य विजयराव बोरगे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

यावेळी जि.प. सदस्य विजयराव बोरगे, गावाचे सरपंच सागर कांबळे, उपसरपंच सयाजी निकम, विद्यमान सदस्य व माजी सरपंच विष्णू यादव, पोलीस उपनिरीक्षक श्री चव्हाण, बँक ऑफ महाराष्ट्र चे कर्मचारी विष्णू पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

3+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!