शिरगावात पुरुष जातीचे एक महिन्याचे अर्भक

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील शिरगाव येथील सटवाई नावाच्या शेताजवळ एक महिन्याचे पुरुष जातीचे अर्भक सापडले आहे. याची फिर्याद येथील पोलीस पाटील प्रकाश पोतदार यांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत शाहुवाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, शिरगाव येथील आनंदा साधू सावंत यांच्या सटवाई नावाच्या शेताजवळ ओढ्याच्या पाण्यात हे अर्भक सकाळी अकरा वाजनेच्या दरम्यान आढळून आले. दरम्यान सगळीकडे कडक संचारबंदी असताना, याशिवाय हे गाव बफर झोन मध्ये येत असतानाही असे कृत्य कोणी केले असावे, याबाबत गावात जोरात चर्चा सुरु होती.

या घटनेचा तपास सहा.पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख करीत आहेत.

6+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!