खाकी वर्दीला लाख लाख सलाम…

बांबवडे : शाहुवाडी पोलिसांनी कोरोना परिस्थिती हाताळताना अक्षरश: आपल्या कुटुंबाची सुद्धा त्यांनी काळजी केलेली नाही. घरची भाजी-भाकरी ची अपेक्षा असतानाही, मिळेल ते खावून दिवस कंठताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिसत आहेत.

चरण तालुका शाहुवाडी येथील शैलजा सर्जेराव पाटील या महिला पोलीस अधिकाऱ्यांची अवस्था सुद्धा तळमळीची झाली आहे. ड्युटीवर सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी परत आल्यावर सुद्धा त्यांना आपल्या मुलांजवळ जाताना भीती वाटते. एकीकडे ड्युटीवर जावून आपले कर्तव्य सांभाळायचे तर दुसरीकडे आपल्या दोन लहान चिमुरड्यांना भेटण्यासाठी त्यांचा जीव व्याकूळ होतो. अशी परिस्थिती याअगोदर कधीही पहायला मिळाली नाही. अशा कठीण प्रसंगी आपले कर्तव्य सांभाळणाऱ्या ह्या खाकी वर्दीला लाख लाख सलाम…

12+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!