होमिओपॅथी असोसिएशन व पत्रकार संघ यांच्यावतीने औषध कीट वाटप

बांबवडे : सध्याच्या कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात पोलीस कर्मचारी, महसूल विभाग, यांच्यासह पत्रकार बांधव आपल्या समाजाचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर तत्पर आहेत. अशावेळी त्यांना कोणत्याही आजाराचा संसर्ग होवू नये, यासाठी औषधांचे वाटप करण्यात आले. हे वाटप कोल्हापूर जिल्हा होमिओपॅथी असोसिएशन व शाहुवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

पोलीस, महसूल विभाग व पत्रकार बांधव या विषाणू संक्रमणाच्या काळातही आपले कर्तव्य बजावण्यासाठी हि मंडळी सातत्याने रस्त्यावर असतात. म्हणून या मंडळींची रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी हे होमिओपॅथिक औषधांचे वाटप करण्यात आले.

शाहुवाडी तालुका डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष व बांबवडे येथील धनंजय होमिओपॅथी क्लिनिक चे डॉ. जयवंत रोडे-पाटील (सरुडकर ), यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

तालुक्यात कार्यरत असणारे १२५ पोलीस कर्मचारी, ७५ महसूल विभागाचे कर्मचारी, व २५ पत्रकार अशा एकूण सव्वा दोनशे जणांना या होमिओपॅथी कीट चे वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. जयवंत रोडे-पाटील, सौ.धनश्री रोडे-पाटील यांच्याहस्ते तहसीलदार गुरु बिराजदार, व सहा.पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष,राजाराम कांबळे यांच्याकडे त्यांच्या सहकाऱ्यांचे कीट देण्यात आले आहेत.

यावेळी ;पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद पवार, उपाध्यक्ष अनिल पाटील, कार्याध्यक्ष आनंदराव केसरे, सचिव संतोष कुंभार, कोषाध्यक्ष रमेश डोंगरे, शाम पाटील, आदींसह पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!