परखंदळे येथील जवानाचे अल्पश: आजाराने निधन

बांबवडे : परखंदळे तालुका शाहुवाडी येथील जवान गामाजी दगडू पाटील वय ४५ वर्षे  सैनिक हवालदार यांचे अल्पश: आजाराने निधन झाले आहे. ते बरेली पंजाब इथं इन्फंट्री सैन्यात सेवेत होते. त्यांचे  पार्थिव आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत परखंदळे इथं येणार आहे. परंतु कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात येणार आहे, अशी माहिती येथील ग्रामपंचायत सदस्य वंदेश कोल्हापुरे यांनी दिली.

इथं अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मोजक्या पाहुणेमंडळींना मास्कचे  वाटप ग्रामपंचायत च्या कोरोना प्रतिबंधात्मक समिती च्यावतीने करण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्यांना सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच यावेळी सोशल डीस्टंसिंग चे पालन करण्याची दक्षता घेण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कोणीही या अंत्यविधीसाठी येवू नये, अशी विनंती परखंदळे कोरोना प्रतिबंधात्मक समिती च्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान यासाठी आज गावात एक दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्यात आला आहे. अंत्ययात्रा सजवलेल्या ट्रॅक्टर वरून काढण्यात येणार आहे. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या घराच्या बाल्कनीतून अंत्यदर्शन घ्यायचे आहे.

स्व. गामाजी पाटील यांच्या पश्चात आई, बायको व दोन मुले असा परिवार आहे. अंत्यविधी संस्कारासाठी दोन दिवस ग्रामपंचायत संचालक मंडळ कामांचे नियोजन करीत आहे.

4+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!