रेशन दुकानदारास नुकसानभरपाई मिळावी : ठमके यांचे निवेदन

बांबवडे : धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील दुकानदाराने बदनामीला त्रासून, आणि रेशन दुकानावर झालेल्या कारवाई च्या मानसिक त्रासामुळे विष पिऊन आत्महत्या केली आहे. शासनाने केलेल्या या कारवाई च्या निषेधार्थ आणि त्या दुकानदाराला त्याच्या हक्काचा दुकानाचा परवाना त्याला परत मिळावा, तसेच दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शाहुवाडी तहसीलदार गुरु बिराजदार यांना निवेदन दिले आहे. सदरचे निवेदन कोल्हापूर जिल्हा रेशन दुकानदार संघटना व शाहुवाडी तालुका रेशन दुकानदार संघटना यांच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष गमाजी ठमके यांनी दिले आहे.

याबाबत निवेदनात असे म्हटले आहे कि, धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील सरकारमान्य रेशन दुकानदार अमोल अशोक मरसाळे यांनी गाव गुंडांच्या त्रासाला कंटाळून विष प्रश्न करून आत्महत्या केली आहे. हे दुकानदार अपंग असून त्यांची एक किडनी देखील निकामी आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबात पत्नी दोन मुले आहेत. मरसाळे यांचे शुटींग करून जाणूनबुजून गुंड प्रवृत्तीचे महेश रमाकांत वाघ उर्फ टिनू यांनी शासनाकडे तक्रार केली . यामुळे त्यांचे दुकानाचा परवाना शासनाने रद्द केला. या त्रासाचा मानसिक धक्का बसल्याने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

या घटनेमुळे त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. या घटनेस कारणीभूत असलेल्या महेश वाघ याच्यावर त्वरित कारवाई करावी. तसेच अमोल मरसाळे यांचा दुकान परवाना रद्द चा आदेश रद्द करून तो त्वरित त्यांच्या कुटुंबाच्या नावावर देण्यात यावा. तसेच त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई त्वरित मिळावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. सदर च्या आशयाचे निवेदन राज्य संघटनेच्या वतीने महसूल विभागाला सुद्धा देण्यात आले आहे.

यावेळी संघटनेच्या वतीने ऐनवाडी, डोणोली, विशाळगड, गेळवडे, परळी, कातळेवाडी, सोनुर्ले, विरळे, कांडवण, शेंबवणे, भाततळी आदी दुकानदार यावेळी उपस्थित होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!