जनतेच्या हक्काच्या धान्यावरच डल्ला : परखंदळे ग्रामस्थांना धक्का

             

बांबवडे : परखंदळे तालुका शाहुवाडी येथील रेशन दुकानदाराकडे कार्ड धारकांसाठी आलेला रेशन कोटा व वितरीत केलेला धान्य कोटा यामध्ये कमालीची तफावत आढळल्याने कार्ड धारकांना धक्का बसला असून, याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार शाहुवाडी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. सदर तक्रारीची प्रत अन्नधान्य पुरवठा मंत्री नाम. छगनराव भुजबळ यांना पाठवली असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवेदन दिले आहे.

याबाबत निवेदनात पुढे म्हटले आहे कि, कोरोना विषाणू संक्रमणाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात काही मंडळी मात्र भाराष्टाचार कोणत्या मार्गाने करता येईल, याची वाट पाहत असतात. सदरच्या दुकानदराने शासनाने जनतेला दिलेला मोफत तांदूळ योजनेमध्ये भ्रष्टाचार केला आहे, त्याचबरोबर इतर धान्य वितरणामध्ये घोटाळा केला असल्याचे निदर्शनास आले आहे.

एप्रिल २०२० या महिन्याचा रेशन कोटा  व मोफत तांदूळ वाटप करताना कोणतीही पावती दिलेली नाही. तसेच ईपॉस मशीन बंद असल्याचे कारण सांगून, साध्या वहीवर देय कोट्यापेक्षा कमी धान्य वितरीत करीत असल्याचे, पडताळणी केल्यानंतर लक्षात आले आहे. दरम्यान ईपॉस मशीन बंद असल्याचे सांगत, विशेष करून महिलांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित ठेवले जात आहे.

शासनाने उदात्त हेतूने सामान्य जनतेसाठी सुरु केलेल्या मोफत तांदूळ या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून सामान्य जनतेच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारला आहे. सदर भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करून कठोर कारवाई करावी, व सदर दुकानदाराचा परवाना रद्द करून, हि शासकीय यंत्रणा दुसरीकडे वर्ग करावी, अशी मागणी सुद्धा या निवेदनात केली आहे.

सदरच्या निवेदनावर निवास लव्हटे, भरत सुतार, सीताराम पाटील, पांडुरंग गुजर, महादेव गावडे, भीमराव दळवी आदींच्या सह्या आहेत.  

3+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!