शाहुवाडी च्या कर्तुत्वाची मोहर मुंबई त उमटतेय : यशवंतराव पाटील

बांबवडे : शाहुवाडी चा मावळा सध्या कोरोना युद्ध भूमीवर म्हणजेच मुंबई इथं आपल्या कौशल्याने लढत आहे. अशा परिस्थितीत सुद्धा आश्रमशाळेत काय कमतरता आहे, याची चौकशी करून त्यांनी आश्रम शाळेला ५ किलो मिरच्यांची चटणी पुरवत, ती कमतरता दूर केली आहे. ती व्यक्ती म्हणजे आपल्या सावर्डे येथील शिवसेनेचे संपर्कप्रमुख यशवंत पाटील हि होय.

यशवंत पाटील हे खंदे शिवसैनिक आहेत. ते मुंबई महापालिका मध्ये कार्यरत आहेत. नेहमीच्या परिस्थितीपेक्षा सध्या ची परिस्थिती वेगळी आहे. कोरोना विषाणू ने तांडव केले आहे. यावेळी जीवाची जोखीम मोठी आहे. परंतु यशवंतराव मुंबई महानगरपालिका मध्ये घन कचरा व्यवस्थापन खात्यात सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. सध्या ते दहिसर च्या प्रभाग क्र. ३ मध्ये “ कोविड योद्धा ” ची भूमिका बजावत आहे. या प्रभागातील साफसफाई, झोपडपट्टी तील व इमारतीतील रहिवासी यांचा कचरा संकलन, शौचालय स्वच्छता व्यवस्थापन करीत आहेत. त्याचबरोबर कोरोना बाधित लोकांचे विलगीकरण व्यवस्थापन ते सांभाळत आहेत.

आपल्या शाहुवाडी च्या मातीतील या तरुणाने आपले कर्तव्य सांभाळत, सह्याद्री च्या कर्तुत्वाचा ठसा मुंबईत उमटवला आहे. अशा तरुणपिढी चा शाहुवाडी ला निश्चित अभिमान आहे. या अनुषंगाने यशवंतराव यांचे शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्रिवार अभिनंदन.

10+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!