द्रोणाचार्यांच्या ज्ञानाची प्रेरणा घेवून यश मिळवून देणारी “ एकलव्य अॅ कॅडमी ”

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षांच्या विद्यर्थ्यांना अभ्यास करूनही येत असलेलं अपयश, हे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम करीत असून, या सगळ्या गोष्टींचा विद्यर्थ्यांसाहित पालकांच्या मानसिकतेवरही परिणाम होत आहे. यासाठी खऱ्या अर्थाने स्वत: ला वाहून घेवून, ज्ञान देणाऱ्या तसेच योग्य दिशेने मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंची आवश्यकता आहे. असे मत “ एकलव्य अॅकॅडमी ” चे श्री संग्राम शेवाळे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले आहे. ते सध्या महाराष्ट्र पोलीस खात्यात पोलीस निरीक्षक या पदावर आपले कर्तव्य बजावीत आहेत.

यावेळी शेवाळे पुढे म्हणाले कि, महानगरांमध्ये स्पर्धा परीक्षांचे झालेले बाजारीकरण, दिशाहीन मार्गदर्शन आणि त्यातून येणारे अपयश यांचा विद्यार्थी व पालक यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या परिणाम होत आहे.

या सगळ्या गोष्टींचा मी व माझे मित्र गेले ५ वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात ३५०० हून अधिक स्पर्धा परिक्षा देत असलेल्या अयशस्वी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या अपयशामागील कारणे व त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला आहे. यातून काही निष्कर्ष समोर आले असून, त्यामध्ये ७-८ वर्षे पूर्व परीक्षा, ३-४ वर्षे मुख्य परीक्षा, अंतिम यादीत नाव येण्यासाठी ४-५ प्रयत्न करून अपयशी झालेल्या विद्यर्थ्यांचा अभ्यास केला आहे.

या सर्व अभ्यासा अंती काही शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून, प्रयत्न केल्यास खात्रीशीर यश प्राप्त होते, या निष्कर्षाप्रत आम्ही पोहचलो आहोत. या यश प्राप्तीसाठी विशिष्ठ असा अध्ययन व अध्यापनाचा साचा तयार करण्यात आला आहे. या साचाचे एकत्रीकरण म्हणजे “ एकलव्य करियर अॅकॅडमी ” होय.

एका नव्या प्रेरणेने आणि ध्येयाने नवी भरारी घेवून, हे गुरुकुल सज्ज झाले आहे.

इथं प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देवून तयारी करून घेतली जाईल,

पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी यांची एकाच ठिकाणी तयारी करून घेतली जाईल. अध्ययनाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.०० अशी राहील.

म्हणूनच “ एकलव्य ” हि संस्था गुरु द्रोणाचार्यांचे ज्ञान आत्मसात करून, ज्ञानदान करून, यश मिळवून देणारी हि एकमेव संस्था असेल. असेही श्री संग्राम शेवाळे यांनी सांगितले.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!