आमदार कोरे यांचा कोरोना पार्श्वभूमीवर मतदारसंघात दौरा

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इथं, आमदार डॉ. विनयराव कोरे ( सावकर ) यांच्या हस्ते जनतेच्या प्रतिकारशक्ती वाढीच्यादृष्टीने आर्सेनिक अल्बम-३० च्या  होमिओपॅथी च्या गोळ्या वाटण्यात आल्या. मतदारसंघातील जनता सुरक्षित रहावी, यासाठी हा उपक्रम असल्याचे, आमदार विनय कोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, आपल्या मतदारसंघातील बहुतांश लोक पुणे मुंबई इथं नोकरी-धंद्यानिमित्त रहात आहेत. सध्या तेथील कामधंदा बंद असल्याने, लोकांची उपासमार होण्याची वेळ आली आहे. त्या अनुषंगाने अनेक लोक गावाकडे येत आहेत. त्यांना सन्मानाची वागणूक आपण ग्रामस्थांनी देणे, हि काळाची गरज आहे. दरम्यान काही मंडळी ई – पास चा चुकीचा वापर करून गावी येत आहेत. तसेच कोणतीही तपासणी न करता गावी येवून रहात आहेत. हे चुकीचे असून मोठ्या शहरातून येणाऱ्या लोकांनी आपली तपासणी करून, विलगीकरण कक्षात राहूनच आपल्या घरी जावे, कि ज्यामुळे कोणताही संसर्ग येथील ग्रामस्थांना होणार नाही. सध्या कोरोना विषाणू चा संक्रमण काळ सुरु आहे. संपूर्ण देशात कहर सुरु आहे. त्यात सध्या शाहुवाडी, पन्हाळा यासह वारणा नगर आणि संपूर्ण मतदार संघात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यावर अद्यापतरी कोणतेही औषध निघालेले नाही. आम्ही संपूर्ण मतदारसंघात याबाबत दौरा केला असून, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कोरोना पासून वाचायचे असेल, तर जनतेची प्रतिकारशक्ती वाढणे, हि काळाची गरज आहे. यासाठी संपूर्ण मतदारसंघातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, सेविका यांच्याद्वारे होमिओपॅथी च्या आर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या जर सगळ्या नागरिकांपर्यंत पोहचल्या, तर लोकांची प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होईल, आणि त्यामुळे जनता कोरोना पासून दूर राहील. असेही आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगितले.

दरम्यान डॉ.कोरे यांनी पेरीड येथील प्रा.एन.डी. पाटील महाविद्यालयास भेट देवून तेथील रुग्णांशी त्यांनी संवाद साधला, तसेच अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्यांचे हि वाटप करण्यात आले. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी कोव्हीड-१९ चे तपासणी चे यंत्र शाहुवाडी इथं सुरु करण्यात आले असून, मतदार संघातील जनतेला याची मदत होईल.

दरम्यान जनतेने घरार राहूनच या विषाणू शी लढा देणे, हि काळाची गरज आहे.

यावेळी शाहुवाडी चे युवा नेते कर्णसिंह गायकवाड, कोल्हापूर जि.प. चे मा. बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, शाहुवाडी पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत, महादेव पाटील, विषाणू पाटील, रंगराव खोपडे, बाबा लाड, विष्णू यादव, सुभाष पाटील आप्पा, यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.निरंकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

3+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!