कामगार ते यशस्वी उद्योजक : विठ्ठल पोवार


बांबवडे :कामगार पासून एक यशस्वी उद्योजक असा खडतर प्रवास पेलणारे एक तरुण व्यक्तिमत्व म्हणजे मा.श्री.विठ्ठल पोवार होय. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला एक प्रकाश झोत …
श्री विठ्ठल विष्णू पोवार जन्म साळशी ता.शाहूवाडी येथे एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. त्यामुळे शिकण्याची इच्छा असून देखील  शिकता आले नाही, कमी वयातच कामगार म्हणून काम करावे लागले पण शिकण्याची इच्छा त्यांना गप्प बसून देत नव्हती त्यांनी नोकरी करत करत आपलं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मुळातच व्यवसाय करण्याची आवड त्यांना असल्यामुळे त्यांनी नोकरीला रामराम ठोकून बांबवडे येथे माऊली फुटवेअर या फर्मची स्थापना केली. सध्या माऊली फुटवेअर बांबवडे पंचक्रोशी मध्ये आपल्या दर्जा आणि गुणवत्ता यासाठी प्रसिद्ध आहे. माऊली फुटवेअर मध्ये सर्व  ब्रँडेड फुटवेअर उपलब्ध आहेत . आपल्याकडे जर इच्छा शक्ती आणि त्यासाठी कष्टाची तयारी असेल तर आपण आपले इच्छित ध्येय साध्य करू शकतो हे विठ्ठल पोवार यांनी सिद्ध करून दाखवले आहे.आपल्या मिळकतीतील काही भाग हा समाजासाठी देण्याची वृत्ती श्री. विठ्ठल पोवार आणि त्यांचे बंधू नामदेव पोवार यांनी सामाजिक बांधिलकीतून आजपर्यंत आहे .६ जून ला श्री विठ्ठल पोवार यांचा वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा . त्यांच्या पुढील वाटचालीस एस.पी.एस.न्यूज च्या वतीने हार्दिक शुभेच्छा…

15+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!