“ बापू ” शतायुषी व्हा…

बांबवडे : “ बापू ”  एक असं नाव कि, जे अनेक प्रश्नांवर उपाय काढतं, मदत करताना कोणालाही तुम्ही कुठल्या गटाचे असा प्रश्न सुद्धा ज्या व्यक्तीला पडत नाही, अशी बिरुदावली लाभलेले, शक्य त्याला, शक्य तितकी मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणजे “ बापू ” . म्हणजेच बांबवडे गावाचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुरेश शंकर नारकर, म्हणजेच सगळ्यांचेच बापू. हे व्यक्त का होतोय?, असा प्रश्न आपल्याला पडला असेल, तर सांगतो, आज बापूंचा वाढदिवस. त्यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त त्यांना “ साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज आणि परिवार ” च्या वतीने त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

खरंच हे व्यक्तिमत्व नेहमी परोपकारासाठी पुढे असतं. प्रत्येकाच्या अडचणीच्यावेळी सर्वार्थाने तयार असलेले बापू, अवघ्या बांबवडे ला भावंत आहेत. आपल्या अनेक प्रश्नांना लपवून, समोरच्याचे प्रश्न समजून घेण्यात आणि ते सोडवण्यात नेहमी पुढे असतात. जगात प्रत्येकाला स्वत;चे प्रश्न असतातंच. परंतु स्वत;च्या प्रश्नांसोबत इतरांचे प्रश्न देखील सोडवताना बापू दिसतात. म्हणूनच या व्यक्तिमत्वाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुनश्च हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुरोग्य लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना .समाजाच्या वतीने देखील त्यांना हार्दिक अभिष्टचिंतन …

8+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!