मदुरा फायनान्स च्यावतीने शाहुवाडी पोलिसांचा सन्मान

बांबवडे : सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात पोलीस प्रशासन आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावत आहेत. याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत, मदुरा मायक्रोफायनान्स लि. यांच्या वतीने शाहुवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

मदुरा फायनान्स च्यावतीने महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील अन्य ५० पोलीस ठाण्यात देखील पोलीस बांधवांना पुष्पगुच्छ देवून तसेच विविध सुरक्षा वस्तूंचे म्हणजेच हँडग्लोव्ह्स, सॅनिटायझर देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी शाहुवाडी पोलीस ठाण्यातील सहा. पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, मदुरा फायनान्स चे शाखाधिकारी महादेव हत्ती, बचत गटातील सदस्य मेघा दळवी, हौसाबाई माने आदी मान्यवर उपस्थित होते.

आरबीआय मान्यताप्राप्त मदुरा कं. ग्रामीण, शहरी, निमशहरी भागातील मध्यम व गरजू महिलांच्या व्यावसायिक व आर्थिक वृद्धीसाठी उत्तम सेवा देण्याकरिता कायमच प्रयत्नशील राहिली आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जपत, यापूर्वीही रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, पूरग्रस्तांना मदत, असे विविध उपक्रम देखील यशस्वीरीत्या राबविले आहेत, अशी माहिती शाखाधिकारी महादेव हत्ती  यांनी दिली.

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!