गणेशनगर रहिवाश्यांनी घाबरू नये : दहशत कोरोनाची परतवून लावा
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे परिसरात कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. दरम्यान येथील गणेशनगर मध्ये राहणारे एक दाम्पत्य यांना कोरोना झाल्याची जोरदार चर्चा गावात होती. परंतु हे दाम्पत्य निगेटिव्ह असल्याचे समजते. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. आणि जरी कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आला तरी कोणीही घाबरू नये. फक्त योग्य खबरदारी आणि उपचार कोरोनाला निश्चित बरे करतो. कारण आपली मानसिक शक्ती जर सशक्त असेल, तर आपण नक्की यशस्वी होतो.
तेंव्हा गणेशनगर मधील रहिवाश्यांनी घाबरून जावू नये. स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. विनाकारण आपण किंवा आपली मुले बाहेर जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, हे सुद्धा एक सामाजिक कार्य आहे. तेंव्हा घरी रहा,सुरक्षित रहा.